विकासाचा मार्ग अनुसरताना भारताला कोणता त्रास सोसावा लागला, यापेक्षा विकास करून घ्यायला नकार दिल्यामुळे या देशाला कोणत्या अनावश्यक यातना सहन कराव्या लागल्या, याचा ‘भारत विकणे आहे’ या पुस्तकात वस्तुस्थितीच्या आधारे मार्मिक उहापोह करण्यात आला आहे. आपल्याला जेव्हा अभिमान वाटायला हवा तेव्हा आपण शरमून जातो, आणि जेव्हा आपली आपल्यालाच लाज वाटायला हवी तेव्हा आपण स्वतःवर खूष होऊन जातो. हे असे का घडते, याचे परखड विवेचन म्हणजे चित्रा सुब्रम्हण्यम यांचा हा महत्त्वपूर्ण लेखसंग्रह. वर्तमानाकडे पाठ फिरवून आपण एकतर वेदांचा आधार शोधू लागतो किंवा भविष्यकाळासंबंधी जागतिक बॅंकेकडे आशाळभूतपणे पाहू लागतो. हा लेखसंग्रह म्हणजे गेल्या पंन्नास वर्षातील आपल्या बालिश वर्तनाचा सडेतोड आलेखच. आपण, आपल्या सभोवतालचे वास्तव आणि इतर वास्तवांच्या संदर्भात या वास्तवाचे मूल्यमापन या संबंधात अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे कार्य हा लेखसंग्रह समर्थपणे पार पाडतो. आपल्या पुढा-यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विदूषकांसारखे वर्तन करून, स्वतःचे आणि देशाचे कसे आणि किती हसे करून घेतले, हे जाणून घेण्यासाठी ‘भारत विकणे आहे’ वाचायलाच हवे.
“इंडीया इज फॉर सेल” या चित्रा सुब्रमण्यम यांच्या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. चित्रा सुब्रमण्यम एक नामवंत पत्रकार असून प्रामुख्याने भारताच्या परराष्ट्रविषयक घडामोडींचा मागोवा घेतात आणि वर्तमानपत्रात त्याविषयी बातम्या, लेख लिहीतात. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा आहे. या क्षेत्रात वावरताना त्यांचा अनेक राजकारण्यांशी आणि उच्चपदस्थ अधिका-यांशी संबंध येतो. त्यांच्याशी भारताच्या परराष्ट्रविषयक धोरणासंबंधी चर्चा करण्याचा योग येतो. हे करताना त्यांना अनेकदा असा अनुभव आला की ज्या लोकांना भारत सरकारने करोडो रुपये खर्च करुन विदेशात इतर देशांसमोर भारताचे मत मांडण्यास पाठविले आहे ते किती नालायक आहेत. निव्वळ फुकटचा विदेश प्रवास या एक कलमी कार्यक्रमाखाली ही लोक विदेशी परीषदांना जातात आणि आपल्या अडाणीपणामुळे तिथे भारताची पार नाचक्की करुन टाकतात. भारत सरकारही निर्बुध्द्पणे अशा लोकांना विदेषवारीसाठी पाठवित असते. यापुस्तकात लेखिकेला आलेल्या याच अनुभवांचे परखड विवेचन आहे. लेखिकेने या पुस्तकात कोणाचेही थेट नाव जरी घेतलेले नसले तरी स्पष्ट घटनाक्रम, तारखा आणि त्याबरोबरच व्यक्तींची सुचक नावे यांच्या आधारे ति व्यक्ती कोण हे समजायला आपल्यासारख्या चाणाक्ष वाचकाला वेळ लागत नाही.
एकंदरीत हे पुस्तक छान असले तरी संपुर्ण पुस्तकात केवळ टीकेचा सुर असल्याने ते रटाळ झाले आहे. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंत केवळ टीका आणि टीकाच. एकंदरीत लेखिका यासर्व राजकारण्यांवर खूप रागावलेली दिसते. परंतु लेखिकेने दाखविली आहे तेवढी परिस्थिती गंभीर असेल असे मला वाटत नाही. राजकारणात आणि सरकारी अधिका-यांत वाईटाबरोबर चांगली माणसेही असतात. पण बाईंनी संपुर्ण पुस्तकात नकारार्थि भूमिका घेतलेली आहे ते मला पटले नाही. एकंदरित हे पुस्तक माहितीपुर्ण आहे आणि भारत सरकारला मार्गदर्शक आहे. त्रयस्थ व्यक्तिचे परिक्षण या भूमिकेतून यातून भारत सरकारला काही पाठ मिळाला असेल तर या पुस्तकाचे चीज झाले असे म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय पिठावर कोणतीही व्यक्ती पाठविण्यापुर्वी ती व्यक्ती त्या कामासाठी खरोखर योग्य आहे का हे तपासून नंतरच त्याव्यक्तीची तिथे रवानगी करणे योग्य ठरेल. केवळ एखादी व्यक्ती एखाद्या खात्याचा मंत्री आहे म्हणून त्याला अशा ठीकाणी पाठवणे अयोग्य आहे. मंत्री म्हणून पद सांभाळणारी व्यक्ती ही जनसामान्यांनी निवडून दिलेली व्यक्ती असते. ती व्यक्ती ती जे खाते साभाळत आहे त्यात तज्ञ असेलच असे नाही. त्याकामासाठी भारत सरकार त्यांना उच्चशिक्षित आय.ए.एस. अधिकारी पुरविते आणि त्या खात्याचा कारभार मुख्यतः तेच पाहतात. मंत्री म्हणजे केवळ एक रबर स्टॅंप असतो. त्यामुळे अशा अनाडी मंत्र्यांना आंतरराष्ट्रीय परीषदांना पाठविणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे या लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे.
Thursday, December 15, 2005
Friday, December 2, 2005
मी आतापर्यंत वाचलेली पुस्तक
मी आजतागायत वाचलेल्या काही पुस्तकांची यादी मी खाली देत आहे. ही यादी परीपुर्ण नसून मला आठवेल त्या प्रमाणे मी ही यादी बनविलेली आहे. यादीची रचना खालील प्रमाणे आहे.
पुस्तकाचे नाव - लेखक - प्रकार - दर्जा १. चंद्रावरचा खून - द. पा. खांबेटे - विज्ञानकथा - *****
२. हेरॉईनचे सौदागर - विजय देवधर - रहस्यकथा - ****
३. दुसरे महायुध्द - वि. स. वाळींबे - इतिहास - *****
४. वॉर्सॉ ते हिरोशिमा - वि. स. वाळींबे - इतिहास - *****
५. पॅपिलॉन - रविंद्र गुर्जर - अनुवादीत रहस्यकथा - *****
६. बॅंको (पॅपिलॉन भाग २) - रविंद्र गुर्जर - अनुवादीत रहस्यकथा - *****
७. मुसोलीनी - मदन पाटील - चरित्र - ***
८. काश्मिर एक ज्वालामुखी - सेतू माधवराव पगडी - राजकीय - ****
९. अँग्री हील्स - रवींद्र गुर्जर, चंद्रशेखर बेहेरे (मुळ लेखक - लिऑन उरीस) - अनुवादीत रहस्यकथा - ***
१०. माओचे लश्करी आव्हान - दि. वी. गोखले - राजकीय - ****
११. दि किलर्स - मदन पाटील - अनुवादीत रहस्यकथा - ***
१२. वॉलॉंग एका युध्दकैद्याची डायरी - कर्नल श्याम चव्हाण - युध्द इतिहास - ****
१३. सुर्यकोटी समप्रभ - माधव साखरदांडे - विज्ञान - ****
१४. कृष्णमेघ - उल्हास देवधर - विज्ञानकथा - ****
१५. युध्दकथा - राजा लिमये - युध्द इतिहास - ***
१६. अब्राहम लिंकन - न. ल. वैद्य - चरित्र - **
१७. मुंबईच्या नवलकथा - गंगाधर गाडगीळ - इतिहास - ****
१८. मुलूखगिरी - द्वारकानाथ संझगिरी - प्रवासवर्णन - *****
१९. देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर - बाळ भागवत - विज्ञान - *****
२०. डोमेल ते कारगिल - मे. ज. शशिकांत पित्रे - युध्द इतिहास - ***
२१. Cosmos - Carl Sagan - Science - *** मराठी भाषेतल्या पुस्तकांचाच रसास्वाद ब-यापैकी घेता येत असल्याने प्रामुख्याने माझे वाचन मराठी पुस्तकांचेच आहे. तरीही आता मी काही प्रमाणात इंग्रजी पुस्तकांचे वाचनही सुरु केले आहे. इंटरनेटच्या स्वरुपात ज्ञानाचा एक मोठा विश्वकोषच खुला झाल्याने वाचनाला आता काही मर्यादा राहीलेली नाही. इंटरनेटवर सर्व प्रमुख इंग्रजी पुस्तकांची ई-बुक आवृत्ती उपलब्ध असल्याने ते विकत घेण्याचीही गरज भासत नाही. इंटरनेटवर गुटेनबर्ग डॉट ऑर्ग नावाची एक वेबसाईट आहे. त्यावर जवळपास २०००० हून अधिक अशा पुस्तकांची डिजीटल आवृत्ती मोफत उपलब्ध आहे ज्याचे प्रकाशन १९०० साल अगोदर झाले होते आणि ज्याचे कॉपीराईट्स संपुष्टात आलेले आहेत, कींवा जे साहीत्य लेखकांनी किंवा संस्थांनी सर्व लोकांसाठी मोफत प्रकाशित केलेले आहे. मला वाटते की असा उपक्रम मराठी पुस्तकांच्या बाबतीही राबवला जावा. आपले साहित्य कालौघात नष्ट होण्यापेक्षा इंटरनेटच्या जाळ्यात अनंतकाळ पर्यंत जगावे असे कोणाला वाटणार नाही?

Thursday, December 1, 2005
पहिले पान
मला अगदी लहानपणापासून पुस्तके वाचण्याचा छंद होता. माझी वाचनाची सुरुवात प्रथम वर्तमानपत्रांपासुन झाली. वडील रोज वर्तमानपत्र आणित, ते शक्या तेवढे वाचण्याचा मी प्रयत्न करीत असे. मी वर्तमान पत्रातला अग्रलेख वाचावा असा मला वडील आग्रह करीत. अग्रलेख नेहेमी माहितीपुर्ण असतात असे त्यांचे मत होते. त्याच काळात मला वर्तमानपत्रातील कात्रणे जमा करण्याचाही छंद जडला. वर्तमानपत्रात प्रकाशित होणारे विविध देशांचे नकाशे आणि केबीके या इन्फोग्राफीक संस्थेने प्रकाशित केलेले वेवेगळ्या विषयांवरचे आलेख संग्रहीत करणे हा माझा प्रमुख छंद होता. ती कात्रणवही अजुनही माझ्याकडे आहे.
इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला इंग्रजी हा विषय सुरु झाला. मला इंग्रजी शिकणे सोपे जावे या उद्देशाने माझ्या मोठ्या भावाने, उमेशने मला अनेक कॉमिक पुस्तके आणुन दिली. या कॉमिक्सनी माझ्या कोवळ्यामनावर चांगले संस्कार घडविण्याचे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला वाचनाची आवड लावण्याचे अमुल्य कार्य केले. त्यासाठी मी माझा मोठा भाऊ ऊमेश याचा सदैव ॠणी राहील.
लहानपणी शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यावरही मी कुठल्याही ग्रंथालयाचो सभासद नव्हतो. शाळेत असताना आम्हाला कधी ग्रंथालयातून पुस्तके दीलीच नाहीत. त्याचा उपयोग फक्त मास्तर लोक करीत. कॉलेजमध्ये गेल्यावरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. आम्हाला फक्त आमच्या कॉलेजच्या अभ्यासाच्या विषयाशी निगडित पुस्तकेच दिली जात. ख-या ग्रंथालयाचा पहिला अनुभव घेतला तो मरिन लाईन्स येथल्या अमेरिकन लायब्ररी मध्ये. ही लायब्ररी पुर्णपणे मोफत होती. अमेरीकन सरकार तिला पैसे पुरवायची. एक आदर्श लायब्ररी कशी असावी याचा ते एक जिवंत नमुना होती. संपुर्ण लायब्ररी मध्यवर्तीरीत्या वातानुकूलीत होती. लायब्ररीती सर्व पुस्तके अगदी कोरी करकरीत होती. त्यांचा संदर्भ विभाग पाहुन तर मला वेड लागायची पाळी आली. इतका परिपुर्ण आणि समृध्द असा संदर्भ विभाग मी याआधी कधीही पाहिला नव्हता. लायब्ररीत प्रवेश केल्यावर आपण जणुकाही अमेरिकेत गेलो आहोत असा भास व्हायचा. कॉलेज सुटल्यानंतर त्या लायब्ररीतल्या संदर्भ विभागात तासनतास बसणे हा माझा रोजचा शिरस्ता झाला होता. काही काळ मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे सभासद होतो. परंतु घरापासून लांब असल्याने मी त्याचा फारसा उपभोग घेऊ शकलो नाही.
१९९० मध्ये मी माझे कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून भारत पेट्रोलियम या कंपनीत तांत्रिक शिक्षणाची उमेदवारी स्विकारली. भारत पेट्रोलियम कंपनीतल्या स्पोर्टस क्लब मध्ये कंपनी कर्मचा-यांसाठी एक लहान पण सुसज्ज लायब्ररी होती. ही लायब्ररी आम्हा एप्रेंटीस लोकांनाही खुली होती. लायब्ररीचे संचालन कामगारांच्याच हातात असल्याने त्यात प्रामुख्याने चावट कथा कादंब-यांचाच भरणा होता. तरीही काही प्रमाणात माहीतीपुर्ण पुस्तकेही होती. माझ्या दीर्घ वाचनाची सुरुवात याच वाचनालयापासुन सुरु झाली. माझा वाचनाचा वेग कमी असल्याने मला जाड कादंब-या वाचण्यास बराच वेळ लागतो. तरी प्रत्येक दिवशी किमान १० पाने तरी वाचावीत असा माझा प्रयत्न असतो.
या ब्लॉगमध्ये मी वाचलेल्या पुस्तकांची नॊंद करणार आहे. त्या पुस्तकाचा सारांश आणि त्या पुस्तकाबद्दलचे माझे मत आणि टीप्पणी मी देणार आहे. माझी स्मृती फारशी चांगली नसल्याकारणाने मी वाचलेली पुस्तके कालौघात मी विसरुन जातो. मला पुस्तकाचे नाव आठवते परंतू त्यापुस्तकातील कथा अथवा माहीती यांचा संदर्भ मी विसरुन जातो. या ब्लॉगमध्ये त्याची कायमस्वरुपी नोंद झाल्याने माझ्या मेंदूचा भार आता काहीसा कमी झाला आहे. परंपरागत डायरीची जागा आता इंटरनेट्वरील ब्लॉग्सने घेतली आहे. ही सुविधा इंटरनेटवर आधारीत असल्याने त्याला स्थल-कालाचे बंधन नाही. तुम्ही मुंबईमध्ये असाल कींवा लॉस एंजल्स मध्ये असाल, तुम्हाला तुमचा ब्लॉग इ-मेल प्रमाणे कुठूनही वापरता येतो. तुम्ही तुमच्या ब्लॉगद्वारे तुमचे विचार जगभरच्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि अगदी महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा अगदी पुर्णपणे मोफत आहे. यूनिकोड फॉंटचा वापर करुन तुम्ही माझ्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये आपले मत व्यक्त करु शकता. खरोखर राष्ट्र, धर्म, वंश, भाषा हे सर्व भेदभाव विसरुन सर्व जग कसे जवळ आलेले आहे याचा हा एक अभूतपूर्व अनुभव आहे.

Subscribe to:
Posts (Atom)